मेंस्ट्रुअल कप एक पर्यावरणपूरक शाश्वत पर्याय’-डॉ आशा चांडक

Spread the love

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृह पूर्णा येथील विद्यार्थिनींना मेंस्तृअल कप चे मोफत वाटप

पूर्णा(प्रतिनिधी)

मासिक पाळी मध्ये सॅनिटरी पॅडला पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप हा शाश्वत आणि पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मासिक पाळी समुपदेशक तज्ञ डॉ.आशा चांडक यांनी केले.

पूर्णा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ता.२३ फेब्रुवारी रविवार रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्या वतीने येथील १६ गरजू एकल पालक विद्यार्थिनींना मेंस्तृअल कपचे वाटप केले आहे. यावेळी डॉ.आशा चांडक बोलत होत्या.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,सध्या वापरात असलेल्या सॅनिटरीपॅड पर्यावरण पूरक व सहजपणे रिसायकल होणारा नाही त्यामुळे आता त्याला एक नवीन पर्याय समोर येत आहे तोच हा ‘मेन्स्ट्रुअल कप’.आहे असे डॉ.चांडक म्हणाल्या, यावेळी मेन्स्टुअल कप वापरण्यासाठी तयार असलेल्या १६ मुलींना मेंस्तृअल कप चे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, राजेंद्र खापरे, पत्रकार श्री नागेश नागठाणे, गृहप्रमुख प्रतिभा भद्रे उपस्थित होते.

You cannot copy content of this page