सोनखेडच्या सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी विरोधातील अविश्वास ठराव बारगळला
सोनखेड ग्रामपंचायत;२ सदस्य गैरहजर राहिले.त्यामुळे अविश्वास ठराव हा तीन चतूर्थांस बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे होऊ शकला नाही पारित
पूर्णा: तालूक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच श्रिमती मुक्ताबाई सोपानराव सुर्यवंशी यांच्या विरुद्ध काही सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेला अविश्वास ठराव अर्ज विरोधक सदस्यांना तिन चतूर्थांस (३/४) म्हणजे बहुमत सिद्ध झाले नसल्यामुळे फेटाळण्यात आला.सदर अविश्वास ठरावाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ता २४ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता सोनखेड ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचासह सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली.यावेळी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचा विरुद्ध एकूण पाच ग्राम पंचायत सदस्यांनी १७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात अविश्वास ठराव अर्ज दाखल केला होता.त्यावरुन महसूल प्रशासनाच्या वतीने सदस्यांना नोटीस तामील करुन २४ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलावण्यात आली होती.यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने ४ सदस्यांनी हातवर करुन होकार दर्शविला तर २ सदस्य गैरहजर राहिले.त्यामुळे अविश्वास ठराव हा तीन चतूर्थांस बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे तहसीलदार बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी पंढरीनाथ शिंदे, सहाय्यक महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार यांनी फेटाळून लावत विद्यमान महिला सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी यांचे सरपंच पद कायम ठेवल्याचे शिक्कामोर्तब केले.याप्रसंगी, पं स विस्तार अधिकारी व्हि के पुरी, ग्रामसेवक एम जे भोसले उपस्थित होत्या.दरम्यान,सोनखेड येथील थेट जनतेतून बहूमताने निवडून आलेल्या महिला सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी यांनी अडिच वर्षाच्या काळात ब-यापैकी सर्वांगीण ग्राम विकास साधला असता काही सदस्यांनी विकासकामात अडथळा आणून परेशान करण्याच्या उद्देशाने त्यांना नाहक त्रास देणे सुरु केले होते.अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी या वेळी दिली.शिवाय,विजयी झालेल्या सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी, उद्योजक सुभाषराव सुर्यवंशी यांचा आमदार डॉ रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे नंदकुमार डाखोरे, सुभाष देसाई,गिताराम देसाई, उत्तमराव ढोणे,प्रा नारायण सुर्यवंशी, हरिभाऊ कदम,चांदोजी बोबडे, मारोतराव बखाल, साहेबराव भाकरे सह आदींनी सत्कार केला.