पूर्णा नदीपात्रात पोलीसांची छापेमारी; जेसीबीसह ट्रॅक्टर जप्त
पो.नि.विलास गोबाडे पथकाची नांदगाव शिवारात कारवाई;२३ लाखांचा मुद्देमाल जप्त;पूर्णेत गुन्हा दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
पूर्णा नदीच्या पात्रात जेसीबीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करून नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करताना नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात पो.नि. विलास गोबाडे( पूर्णा पोलिस) पथकाने बेधडकपणे कार्यवाही करत जेसीबी सह,एक ट्रॅकर असा सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई ही मंगळवारी ता.२५ रोजी करण्यात आली.याप्रकरणी पूर्णा पोलीसांत वाहन चालक व मालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा पोलिस ठाण्याचा हद्दीत येणाऱ्या नांदगाव (ता. परभणी) येथील पूर्णा नदीपात्रात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि विलास गोबाडे यांनी आपले सहकारी पो.शि मंगेश जुक्टे, जमादार काळे, पो.शि चौरे,पो.शि.अजय माळकर, होमगार्ड वैद्य, बोबडे यांना सोबत घेऊन मंगळवारी नांदगाव शिवारात जेसीबीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापेमारी केली. यावेळी पोलीसांना येथिल नदीपात्रात पिवळ्या रंगाची ३ डी एक्स कंपनीची जेसीबी पोकलॅन व विनानंबर ट्रॅक्टर आढळून आला. पोलिसांना पहाताच घटना स्थळांवरून वाहन चालकांसह तस्करांनी वाहने नदी पात्रात सोडून पळ काढला पोलीसांनी सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुर्णा पोलीस ठाण्यात जमा केला आहे. दरम्यान रेतीमाफीया टिप्पर चालक मालकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शना खाली फौजदार पडलवार करत आहेत. दरम्यान, या अवैधरेती उत्खनन व वाहतूक पोलीस कारवाईमुळे चोरट्या मार्गाने वाळूचे उत्खनन व तस्करी करणाऱ्या माफीयांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून आहे.
पूर्णा नदीपात्राच्या नांदगाव शिवारांसह सुकी,पिंपळगाव,संदलापूर,कान्हेगांव,पूर्णा,निळा,कानडखेड परिसरात वाळूचा उपसा करून मोठ्या प्रमाणात विनापरवाना वाहतूक केली जात आहे.वाळू चोरी मुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे.तर सुरू असलेल्या वाळू तस्करीची पाठराखण करत प्रशासनातील काही अधीकारी आपली झोळी भरत आहेत.कर्तव्यात कठोरपणे भुमिका अबलंणारे अधिकारी कर्मचारीही प्रशासनात आहेत.मागील काही दिवसांपूर्वी कळगांव,मुंबर,एरंडेश्वर आदीं ठिकाणी धडाकेबाज कार्यवाही करण्यात आली आहे.असे असताना तालुक्यात मात्र वाळू चोरीला प्रश्न ऐरणीवर आला आहे.प्रशासनातील कर्तव्य कठोर असलेल्या अधीका-यांनी कडक भूमिका घेत वरील ठिकाणी देखील कार्यवाही करावी अशी माफक अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.