अज्ञात वाहनाने पल्सरला उडवले;एक जागीच ठार

Spread the love

झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावरील कात्नेश्वर शिवारातील घटना;एक जखमी

पूर्णा(प्रतिनिधी)

झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावरील कात्नेश्वर शिवारात एका पल्सरला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना शुक्रवारी ता.२८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले असून घटनेत एका २१ वर्षीय पल्सर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याच्या सोबत असलेल्या एक जणं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नागनाथ नामदेव पिसाळ वय २१ वर्ष रा.एरंडेश्वर ता.पूर्णा जि.परभणी असं त्या मयत पल्सर चालकाचे नाव आहे.मयत पिसाळ हे शुक्रवारी ता.२८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास झिरो फाटा रस्त्याने पुर्णेकडून एरंडेश्वर कडे येत असताना कात्नेश्वर शिवारातील दादाराव चापके यांच्या शेत आखाड्याजवळ त्यांच्या विना नंबरच्या पल्सरला एका अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली.धडकेत पल्सर चकनाचुर झाली असून,या दुचाकीवरील चालक नागनाथ पिसाळ यांना गंभिर ईजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा सोबत असलेल्या अन्य एक गंभीर जखमी झाला असून त्याचे नांव मात्र नक्की समजू शकले नाही.त्त्यांचेवर परभणी येथे उपचार सुरू असल्याचे समजते.घटना घडतात स्थानिक नागरिकांनी वाहनधारकांनी पोलिसांना खबर देत दोघांना परभणी येथे उपचारासाठी हलवीले होते.घटनास्थळी पो.नि.विलास गोबाडे,जमादार श्यामराव काळे,पोशि.मंगेश जुकटे, पो.शि.संदिप चौरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्षतीग्रस्त वाहन ताब्यात घेऊन पंचनामा केला.मयत एरंडेश्वर येथिल सरपंच मुंजाजी पिसाळ यांचे चुलत बंधु आहेत.

You cannot copy content of this page