सुमित लोहिया यांचे निधन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

शहरातील आनंदनगर येथील रहिवासी असलेले व्यापारी सुमित राजकुमार लोहिया यांचं सोमवार ता.३ मार्च रोजी सायंकाळी ७;३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचं वय ३४ वर्षे होतं.

सुमीत लोहीया हे मागील काही दिवसांपासून एकृताच्या आजाराने त्रस्त होते.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी ४ मार्च रोजी येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार असुन,सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा आनंदनगर येथील निवासस्थान येथून निघणार आहे.सुमीत लोहीया यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,एक मुलगा,बहीण,भावजी, काका, काकी,असा मोठा परिवार आहे.

पूर्णा शहरातील प्रसिद्ध संजय बोअरवेलचे मालक राजकुमार छगनलाल लोहीया यांचे ते सुपुत्र तर संजय लोहीया यांचे ते पुतणे होत.

You cannot copy content of this page