सार्वजनिक भिम व बुद्ध जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी उत्तम खंदारे तर सचिव अँड हर्षवर्धन गायकवाड यांची निवड

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल सार्वजनिक भीम व बुध्द जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा पालीकेचे गटनेते उत्तमभैया खंदारे तर सचिव पदी अँड हर्षवर्धन गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

पूर्णा येथिल बुद्ध विहारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मंगळवारी ४ मार्च रोजी सायं पूज्य भंदन्त उपगुक्त महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.यावेळी बैठकीस भंते पय्यावंश अध्यक्ष म्हणून तुकाराम ढगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अध्यक्ष म्हणुन उत्तम खंदारे व सचिव अॅड. हर्षवर्धन गायकवाड, उपाध्यक्ष श्रीकांत हिवाळे व राजकुमार सुर्यवंशी यांच्यासह कार्यकारीणीत दादाराव पंडित, चक्रवर्ती वाघमारे, किशोर ढाकरगे, मोहन लोखंडे चेतानंद वाघमारे, प्रविण कनकुटे, कुंदन ठाकुर, त्रेबंक कांबळे व सल्लागार प्रमुख म्हणुन प्रकाशदादा कांबळे, यादव भवरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page