परभणीत ठाकरे गटाला धक्का; महीला आघाडी जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटेंचा शिंदे सेनेत प्रवेश

Spread the love

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

गंगाखेड (प्रतिनिधी)

परभणीत ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला असुन, महीला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटें यांनी ठाकरे गटाला’जयमहाराष्ट्र’ करत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे.मुंबई एका छोटेखानी कार्यक्रमात पक्षाचे नेते मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकां सोबत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाला गळती लागली आहे.मागील महिन्यापासून पक्षाचे खा.संजय जाधव यांचे खंदे समर्थक समजले जाणारे मावळे एक एक करून ठाकरेंच्या सेनेची साथ सोडत असल्याचे दिसून येत आहे.विधानसभेत पराभव झाल्यानंतर जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आपल्या समर्थकांसोबत ठाकरे सेनेला ‘जयमहाराष्ट्र’ केला होता. आता त्यांच्या पाठोपाठ मागील अनेक वर्षांपासून शिवसेना महीला आघाडीचे जिल्हा प्रमुखपद यशस्वीपणे सांभाळणा-या पक्षाच्या निष्ठावंत,आक्रमक नेत्या म्हणून छबी असलेल्या सखुबाई लटपटें यांनीही काल मंगळवारी ता.११ रोजी मुंबई येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी त्यांच्या सह जिल्ह्यातील महीला आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला असल्याचे समजते.

सखुबाई लटपटें ह्या अनेक वर्षांपासून‌ शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत.त्यांचा पक्ष संघटनेच्या आंदोलनात हिरहीरीने सहभाग होता.अनेक आंदोलनात त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत.त्यांनी ठाकरे गटाला जयमहाराष्ट्र केल्याने मोठी पोकळी निर्माण होणार आहे.तर दुसरीकडे शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढली आहे.

You cannot copy content of this page