जि.प.च्या मुख्याधिका-यां कडून देऊळगांवच्या शिक्षीकेचे निलंबित

Spread the love

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

परभणी(प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी जिल्हा परिषद शाळेच्या वर्तुळाला हादरा देणारी कारवाई केली आहे.पूर्णा तालुक्यातील देऊळगांव दुधाटे येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेस निलंबित केले आहे.त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

देऊळगाव दुधाटे येथील या शाळेत सीमा राजेंद्र पौळ या कार्यरत होत्या. परंतु, विद्यार्थ्यांना न शिकवणे, सातत्याने रागावणे, स्वतः मोबाईलवर खेळत बसणे, घटक चाचण्या न घेणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती विषयी अवमानकारक लिखाण करणे असे उद्योग सुरु होते. याबाबत चौकशी अहवालातून या गोष्टी पुढे आल्याबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी माथूर यांनी या संबंधिचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून,आता शिक्षणासारख्या कामात कसूर करणाऱ्या क्षिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

You cannot copy content of this page