श्री.गुरुबुद्धीस्वामी पाडवा यात्रा महोत्सवास शनिवार पासून प्रारंभ
अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण व शिव महापुराण कथा सोहळा, श्रींचा पालखी सोहळा प्रसिद्ध खिर हुलपल्लीच्या महाप्रसादाचे आयोजन
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील संत श्री गुरूबुध्दिस्वामी पाडवा यात्रा महोत्सवास ता.२२ मार्च शनिवार पासून प्रारंभ होणार आहे.यात्रेनिमीत्य अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण व शिव महापुराण कथा सोहळा, श्रींचा पालखी सोहळा प्रसिद्ध खिर हुलपल्लीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे.
लिंगायत संप्रदायातील संत श्री गुरू बुध्दिस्वामी मठ संस्थान, लासिना, पूर्णा येथे गुढीपाडवा यात्रा महोत्सव ता.२२ ते ३१ मार्च दरम्यान साजरा होणार असून, यानिमित्ताने पूर्णेत विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले असून, जय्यत तयारी सुरू आहे.अखंड शिवनाम सप्ताह, अंतर्गत ग्रंथराज परमरहस्य पारायण मार्गदर्शक श्री नारायणअप्पा चौकले, सितारामअप्पा कापुसकरी व महिला रूद्र मंडळ, पूर्णा. शिवमहापुराण कथा प्रवक्ते श्री नागेश महाराज विभुते वाडी (दमई)यांचे संगित शिवमहापुराण दुपारी १ ते ४ पर्यंत,दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६ शिवपाठ, सकाळी ६ ते ७ रुद्राभिषेक, सकाळी ७ ते ९ परमरहस्य ग्रंथ पारायण,
सायं ४ ते ५ गाध्यावरील भजन, रात्री ८ ते १० शिवकीर्तन ता.२४ रोजी शि.भ.प.बालाजी महाराज काकांडीकर,ता.२५ रोजी,शि.भ.प. सरस्वतीताई स्वामी (अंबाजोगाई),ता.२६ रोजी शि.भ.प.श्री संजय महाराज येळापुरे ता.२७ रोजी शि.भ.प.श्री परमेश्वर केते (मांजरम),ता.२८ रोजी शि.भ.प. रजनीताई मंगलगे,ता.२९ रोजी शि.भ.प. शिवशरण गुरुजी रटकलकर (शिवाराष्ट्रीय भूषण),ता.३० रोजी दुपारी २ वा.शि.भ.प.श्री नागोराव शिराळे (फुलकळसकर) टाळ आरती वरिल किर्तनतर रात्री ८ वा.शि.भ.प.श्री नागेश स्वामी (कुरुंदा),यांचे शिव किर्तन होणार आहे.ता.३१ रोजी सकाळी ९ वा.श्री ष.ब्र.प.डॉ. नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे प्रसादावरील किर्तन दुपारी १२ ते ६ महाप्रसाद प्रसिद्ध खिर, हुलपल्लीचा प्रसाद होईल. व रात्री १० वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक आदीं धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.