तिरुपतीकडे धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

Spread the love

परभणी(प्रतिनिधी) :

उन्हाळा सुट्टी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार गाडी संख्या 07605 तिरुपती-अकोला या गाडीला शुक्रवार 4 एप्रिल ते 27 जून पर्यंत, गाडी संख्या 07606 अकोला-तिरुपती या गाडीला रविवार 6 एप्रिल ते 29 जून पर्यंत, गाडी संख्या 07609 पूर्णा-तिरुपती या गाडीला सोमवार 7 एप्रिल ते 30 जून पर्यंत तर गाडी संख्या 07610 तिरुपती-पूर्णा या गाडीला मंगळवार 8 एप्रिल ते 01 जूलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रकाप्रमाणे धावतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.

You cannot copy content of this page