कुणाल कामरावर गुन्हा नोंदवा पूर्णेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे निवेदन
राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाणे प्रकरण
पूर्णा(प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर नुकतेच कुणाल कामराने एक गाणे प्रसिद्ध केले आहे.या गाण्यामुळे शिंदे समर्थकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.पूर्णेतील शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी २५ रोजी पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांना कुणाल कामरा विरोधात निवेदन देऊन त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाच्या वतीने यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आमच्या पक्ष्याचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बदल वायफळ गाणे म्हणून मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची बदनामी केल्यामुळे त्या मुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत तसेच समाजात तेड निर्माण होत आहे. त्या मुळे वरील इसमावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.गुन्हा न नोदविल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदनावर जिल्हा प्रमुख माधव कदम यांच्या सह एकनाथ लोखंडे, प्रकाश क-हाळे, अँड विशाल किरणे,अंकित कदम,लक्ष्मण कदम, बाबुराव डोईफोडे,सोपान कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.