ताडकळस येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी कार्यकारणी जाहीर
पूर्णा(प्रतिनिधी)-
शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त शाखेमधून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व प्रबोधनाचे कार्य करत आहे. दिनांक 25 मार्च रोजी पूर्णा तालुक्यातील ताडकळस या गावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवीन शाखा जिल्हा कार्याध्यक्ष सहादू ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झाली यावेळी निरीक्षक म्हणून राज्य पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव घुले तर प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आप्पाराव मोरताठे व महिला विभागाच्या प्रमुख निर्मलाताई भालके या उपस्थित होत्या. यावेळी ताडकळस शाखेचे अध्यक्ष म्हणून भास्कर गंगाधर अंभोरे, उपाध्यक्षपदी बालाजी मारोतराव शिंदे व अशोक शिवराम पोले, शाखा कार्याध्यक्षपदी उत्तमराव अंभोरे, प्रधान सचिव पदी रामकिशन कदम, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह पदी शिवाजी सानके, विविध उपक्रम विभाग कार्यवाह पदी दिनानाथ अंभोरे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाहक पदी भास्कर क्षीरसागर, महिला विभाग प्रमुख पदी रूपाली लकडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी आप्पाराव मोरताठे व प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घुले यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात उपस्थितांना माहिती दिली तर अध्यक्षीय समारोपात एस.डी ठोंबरे यांनी केला. यावेळी ताडकळस व परिसरातील समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते.