ईफ्तार पार्टी;सर्वधर्मिय समाज बांधव एकत्र; मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त दिल्या शुभेच्छा

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

रमजान महिन्यात तमाम मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना नेते विशाल कदम यांच्या वतीने श्रृणानुबंध कायम रहावे यासाठी शुक्रवारी २८ रोजी भव्य ईफ्तारपार्टीचे आयोजन केले होते.यावेळी सर्व धर्मीय समाजबांधवांनी ईफ्तारपार्टीला उपस्थिती दर्शवून शहरात सामाजिक सलोखा कायम असल्याचा संदेश दिला आहे.प्रसंगी मुस्लिम बांधवांना रमजान महीना व आगामी ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

मुस्लिम समाजात पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे रमजान या निमित्त हिंदू मुस्लिम बांधवात एकता निर्माण राहावी या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते आज देखील पूर्णा शहरातील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष विशाल कदम यांच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थीत प्रकाशदादा कांबळे, संतोष एकलारे,उत्तमभैय्या खंदारे,पो.नि.विलास गोबाडे, शेख.लतीफभाई ,शेख खुद्दुस, अमजद नुरी,डॉ हरिभाऊ पाटील, जगदीश जोगदंड, गजानन हिवरे, नागेश नागठाणे, रेसुबलाचे जावेद भाई,जाकिर पठाण,बाबा पठाण, संदिप ढगे, इशूभैया पठाण, ईलीयासभाई, रौफ सर कुरेशी, प्रविण गायकवाड, रवि गायकवाड, अशोक वाघमारे, प्रवीण कनकुटे ,संतोष पारटकर, अविनाश गायकवाड, हर्षद कापूरे, संदिप नरवाडे, बाला गायकवाड, ध्रुव गायकवाड व सर्व मुस्लिम बांधव उपस्थितीत होते.यावेळी विशाल कदम, प्रकाशदादा कांबळे, संतोष एकलारे, उत्तमभैय्या खंदारे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देखील दिल्या.

You cannot copy content of this page