Breking News;परभणीत राजकीय भूकंप; पूर्णेतील बालाजी देसाई सह पूर्णा बाजार समितीचे सभापती,उपसभापती संचालकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थिती १०० हुन अधिक आजी-माजी लोकप्रतिनिधी ंचा जाहीर पक्षप्रवेश
पूर्णा /प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तसेच पाथरी तालुक्यात भारतीय जनता पक्षाने भूकंप घडून आणला आहे. मंगळवार 2 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर),मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पुणेतील ठाकरे गटाचे दिग्गज नेते शिवसेनेचे मा.जिल्हा बाजार समितीचे मा. सभापती बालाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती उपसभापती, दहा संचालक, पंचायत समितीचे माजी सभापती, माज जिल्हा परिषद सदस्य असे १०० हुन अधिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.यामुळे ठाकरे गटाला जबर धक्का लागला आहे.
विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यांमध्ये पक्षांतरणाला मोठे उधाण आलं आहे. सत्ताधारी पक्षातील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकापाठोपठ एक राज्यातील अनेक नेते पक्षप्रवेश करत आहेत. नुकतेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सितारामजी घनदाट यांच्या राष्ट्रवादी, व शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गटाचे) विशाल कदम यांचा शिंदे सेनेत प्रवेशानंतर आता भारतीय जनता पक्षाने गंगाखेड मतदारसंघातील पूर्णा तालुक्याला सुरंग लावला आहे भाजपने ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते बालाजी देसाई यांच्यासह बाजार समितीतील सभापती बालाजी खैरे, उपसभापती नारायण पिसाळ, माजी पंचायत समिती सभापती व्यंकटराव देसाई, माजी जिल्हा परिषद विश्वनाथ सोळंके, मनोज सोळंके पात्री येथील जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, अरुण कोल्हे ,माणिक भुमरे ,प्रभाकर दादा वाघीकर, तर पूर्ण बाजार समितीचे संचालक दीपक बोबडे, डॉ .जयप्रकाश मोदानी ,नामदेव ठाकूर, संतराम ढोणे, छबू लोखंडे, माधव नादरे ,सुरज पारवे, अशा एकूण नऊ संचालकासह तालुक्यातील बाजार समितीचे माजी संचालक उत्तमराव नादरे, अशोक खैरे, बालाजी डाखोरे, आनंद सोनटक्के सरपंच कैलास वाघ, राजू कुर्रे, माणिक बोकारे,सभापती उपसभापतीं सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटाला मोठा हादरा मानला जात आहे. या पक्षप्रवेशावेळी प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचे नेते सुरेश भुमरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.