प्रदिप कामळे यांनी स्विकारला दमरेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार

Spread the love

निती सरकार यांची बदली.

पूर्णा(प्रतिनिधी)४ एप्रिल २०२५

नांदेड विभागाचे नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून प्रदिप कामळे यांनी विद्यमान व्यवस्थापक निती सरकार यांच्या कडून ता.४ एप्रिल रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

  नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी  .प्रदीप कामळे  यांनी भारतीय रेल्वे मध्ये आपल्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत दक्षिण रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध महत्वाच्या पदावर कार्य केले आहे. आपल्या पहिल्या पोस्टिंग मध्ये प्रदीप कामळे हे सहाय्यक यांत्रिकी अभियंता /मद्रास/ दक्षिण रेल्वे येथे १९९८ मध्ये  रुजू  झाले होते. त्यानंतर त्यांनी कोचिंग डेपो ऑफिसर बिलासपुर येथे कार्य केले. वरिष्ठ यांत्रिकी अभियंता / नागपूर, मुख्य यांत्रिकी अभियंता /बिलासपुर, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक/ मोतीबाग वॅगन रिपेयर वर्कशॉप /रायपूर, मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता / कोचिंग/ बिलासपूर येथे कार्य केले. ते प्रतिनियुक्ती वर  मुख्य दक्षता अधिकारी / मोईल / नागपूर येथे जवळपास ३ वर्ष  कार्यरत होते. 

नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदी रुजू होण्यापूर्वी ते बिलासपुर येथे मुख्य यांत्रिकी अभियंता / डीजेल आणि आपत्ती व्यवस्थापन/दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे कार्यरत होते.   भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/ जमालपूर, INSEAD / सिंगापूर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर लीडरशिप इन फायनान्स (ICLIF)/ मलेशिया यासारख्या प्रतिष्ठित रेल्वे संस्थांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. मोतीबाग वर्कशॉपमध्ये बायो टॉयलेट आणि इनोकुलम जनरेशन प्लांटच्या प्रोटोटाइप डेव्हलपमेंट कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या काळात मोतीबाग वर्कशॉपमध्ये नॅरोगेज ते ब्रॉडगेज रोलिंग स्टॉक देखभालीचे कामही करण्यात आले. नागपूर विभागात त्यांच्या कार्यकाळात मोतीबाग आणि नागपूर येथील नॅरोगेज संग्रहालयांचा विकासही करण्यात आला.

प्रदीप कामळे यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे.ते भारतीय रेल्वे यांत्रिकी सेवा (इंडियन रेल्वे सर्विस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स) १९९४ बॅचचे अधिकारी आहेत.दिनांक २१ मार्च , २०२३ रोजी नांदेड विभागात रुजू झालेल्या श्रीमती नीति सरकार, IRAS यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

You cannot copy content of this page