शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी विशाल कदम
शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र
पूर्णा(प्रतिनिधी)
शिवसेना शिंदे गटाचे नेते विशाल कदम यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली असून, बुधवारी ९ एप्रिल रोजी मुंबई येथे पक्षाचे नेते खा.श्रीकांत शिंदे यांनी निवडीचे पत्र देऊन पुढील जबाबदारी देत शुभेच्छा दिल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सव्वालाख मतदान घेणारे विशाल कदम यांनी नुकताच नांदेड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ भाई शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता.त्यांनी पक्ष सचिवांना दिलेल्या सुचनेनुसार शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख पदी कदम यांची निवड जाहीर केली. निवडीचे पत्र ससंदरत्न खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, यावेळी शिवसेना सचिव मा. श्री संजयजी मोरे,शिवसेना नेते मा. आ. अर्जुन भैय्या खोतकर, सुभाष साळुंके संपर्क प्रमुख, खासदार मा. श्री धैर्यशील माने, शिवसेना नेते आनंदीजी भरोसे,पालमचे शिवाजी शिंदे, पूर्णेचे सचिन कदम व इतर मान्यंवर उपस्थित होते.शिवसेना नेते विशाल कदम यांच्या निवडीची वार्ता धडकताच पूर्णा शहरासह जिल्ह्यात कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला आहे.












