श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा;आहेरवाडी येथे भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांचा महासागर..

Spread the love

भक्तीमय वातावरणात यात्रा संप्पनहजारों भाविकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचींही हजेरी

पूर्णा(प्रतिनिधी)/१० एप्रिल

आहेरवाडी येथिल गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ. मंदिरात सजगीर महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी.आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगतीचे चित्र.यात्रेनिमीत्य कुस्त्यांची भव्य दंगल. तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज ,हिरागिर,रामगीर महाराज यांच्या यात्रेनिमित्त गुरुवारी १० एप्रिल रोजी सायं भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांचा महासागर लोटल्याचे चित्र पहावयास मिळाले.  

   पुर्णा तालुक्यात दरवर्षी आहेरवाडी येथे चैत्र महिन्यात श्री.सजगीर महाराज हिरागिर,रामगीर महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशीसह जिल्ह्याबाहेरील हजारो भाविक या यात्रेस हजेरी लावतात. गुरुवारी या यात्रेची महाप्रसादाने सांगता झाली. भाजी-भाकरीच्या प्रसादाला आहे महत्व भाजी करण्याची तयारी एकदिवस अगोदर पासून असते. गावातील प्रत्येक समाजातील लोक यासाठी योगदान देते.सात दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा,तसेच यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री गावांतून पालखी काढण्यात आली.गुरुवारी लाखों रुपयांची बक्षीसे असलेली निकाली कुस्ती स्पर्धा पार पडली.

यात्रेतील वांग्याची भाजी व भाकरीच्या महाप्रसादला अन्यन साधारण महत्व आहे. चार मोठ्या कलयीचा  भाजी बनविण्यात वापर झाला तर गावातील चारशे घरून चपात्या आल्या आणी प॓च क्रोशीतील भाविक भक्ता भाकरी घेऊन यतात. यासाठी ९० ते ९५ क्विंटल वांगी,७० क्विंटल भाकरीच्या पिठाचा उपयोग झाला.५० हजारांहून अधिक भक्तांनी या  महापंगतीस बसून  भाजी भाकरीचा प्रसाद ग्रहण केला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती.. परभणीचे खा.संजय जाधव, स्वाभीमानीचे शेतकरी संघटनेचे नेते मा.खा.राजु शेट्टी,आ.डाॅ.राहुल पाटील, आ.डाॅ.गुट्टे यांच्या सौभाग्यवती, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, यांनी सजगीर महाराज समाधीचे दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला.यांच्यासह स्थानिक पक्ष प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आदीं मान्यवरांनी सर्वांसोबत पंगतीत बसून प्रसाद घेतला. यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्त्यांच्या दंगलीचाही भाविकांनी आनंद लुटला.यात्रेच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page