तरुणांनी घडवले मुक्या जनावरांवराप्रती माणुसकीचे दर्शन

Spread the love

पूर्णेच्या रेल्वे कॉलनीतील प्रकार ;डांबराने बरबटलेल्या गायीची केली सुटका


पूर्णा (प्रतिनिधी)
रस्त्याचे काम सुरू असताना एक गाय डांबरात बरबटली त्या डांबरारापासुन तीची सुटका करण्यासाठी पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेले पुर्णेतील तरुण मदतीला धावून येत गायीवर उपचार करुन माणुसकीचे दर्शन घडवण्याचा प्रकार पूर्णा शहरातील रेल्वे कॉलनी भागात घडल्याचे उघडकीस आले आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,पूर्णा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत .दि.१७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे कॉलनी भागातील रेल्वे शाळेजवळ एक गाई डांबराने बरबटलेल्या अवस्थेत असल्याचे राजकुमार भालेराव नामक तरुणास आढळून आली.त्या गायीवर कोणीतरी खोडसाळपणे डांबर टाकले असावे अशी चर्चा त्यांनी ऐकली.भालेराव यांनी वेळ न दवडता त्यांनी पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेले येथील डॉ.कैलास श्रीमल यांना कळविले .ते सहकारी मित्र डॉ. प्रकाश हनुमंते,भैय्या साहेब मस्के,प्रशांत मोरे,नितीन जोंधळे,बंटी हंकारे यांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.सदरील गायीच्या अंगावर मोठ्या प्रमाणात डांबर चिकटलेले तसेच गरम डांबराने चटके बसुन तीला ईजाही झाली होती. डांबरामुळे गाय त्रस्त होती आणि अंग वरचे डांबर मुळे कातडे सुद्धा निघाले होते.४१ सेल्सिन्स तापमानात त्या गायीच्या अंगावर चे डांबर गरम होऊन तिला खूप वेदना झाल्या होत्या. डॉ.श्रीमल व डॉ.हनमंते यांनी ईतर सहकारी मित्रांच्या मदतीने गायीच्या अंगावर असलेले डांबर काढण्यास सुरुवात केली.सलग ३ तासांपर्यंत डांबर काढण्याचा काम चालू होते.आणि ३ तासा नंतर पूर्ण पाने डांबर निघाला योग्य ते उपचार करून तिला त्याच ठिकाणी सोडण्यात आले.त्यांनी गरम डांबराच्या त्रासापासून मुक्ती मिळवत मुक्या प्राण्यांवर प्रेम दाखवत माणुसकीचे दर्शन घडवले हे सर्व दृश्य पाहून परिसरातील नागरिकांनी गायीच्या मदतीला धावून आलेल्या तरुणांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page