परभणीत दोन गटात तुफान दगडफेक
एकबाल नगरातील घटना;दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड;पोलीसांनी परीस्थितीवर मिळवले नियंत्रण
परभणी(प्रतिनिधी)
परभणी शहरातील एक बाल नगर भागातील वसाहतीमध्ये शनिवारी १९ एप्रिल रोजी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून,घटनेत दुचाकी सह चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, सदरील घटना ही लहान मुलांच्या भांडणातून घडल्याची प्रार्थमिक माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,परभणी शहरातील इकबाल नगरामध्ये उद्यान आहे. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारा लहान मुलांमध्ये वाद झाला. परिसरातील लोकप्रतिनिधींनी दोन्ही समाजाकडील लोकांची समजूत घालत वाद मिटवीला. त्यानंतर सायंकाळी
७:३० च्या सुमारास या भागात दोन्ही गटामध्ये तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. घरावर देखील दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीत काही जन जखमी झाले आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीव्र ही दगडफेक करण्यात आली आहे. सध्या या परिसरात तनावपुर्ण शांतता आहे.
लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या वादात परभणी शहरातील एकबाल नगरात दोन समाजातील गट समोरा समोर आले. त्यांच्यात तुफान दगडफेक झाली. यामध्ये जवळपास २० दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर काही जन जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, पोलीसांनी परिस्थिती वर वेळीच नियंत्रण मिळवले आहे.सर्वत्र शांतता आहे हकोणीही अफवा पसरवू नये शांतता बाळगावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.












