शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार;अजित पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश..

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार पडले असून शनिवारी २६ रोजी परभणी येथिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आजी-माजी लोकप्रतिनिधी सह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार हे शनिवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज नरसिंह पोखरणी येथे महा अभिषेक पूजा केली त्यानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याला हजेरी लावली. या मेळावा प्रसंगी अजित दादा सह पक्षाचे नवाब मलिक, आमदार राजेश दादा विटेकर, जिल्हाध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी पूर्णा तालुक्यातील शरद चंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आ.राजेशदादा विटेकर , जिल्हाध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख, यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई, पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव बोकारे,ताडकळस बाजार समितीचे उपसभापती अंकुश शिंदे,उपजिल्हाध्यक्ष श्रीधरराव पारवे, मा. नगराध्यक्ष जाकीर कुरेशी,शहराध्यक्ष अखिल अहमद, सुभाष खर्गखराटे,माधव दुधाचे,पंढरी लोखंडे ,नाना खंदारे, माऊली वानखेडे, आबासाहेब पवार, मकदुम कुरेशी, मधुकर गायकवाड,सलीम सौदागर,अहमद बागवान,ईलीयास बर्तनवाले,अँड गोविंद शिंदे, शंकर शिंदे,डि.एन. किरगे,आनंद जोगदंड, अंकुश शिंदे, तुकाराम चव्हाण, शंकर नवघरे, रघुनाथ डाखोरे सह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातात बांधले.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नसलेल्या अनेकांची पक्ष प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत नावे जाहीर करण्यात आली.त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांनी सांगितले की आम्ही आमचा पक्ष सोडून कोणत्याही पक्षात गेलेलो नाही.ज्या पक्षात आहेत तेथेच समाधानी आहोत सदरील पक्ष प्रवेशाशी आमचा काहीही एक संबंध नसल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page