पूर्णा नदीच्या रेल्वे पुलावर आढळला अनोळखी ईसमाचा मृतदेह
रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय; लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल पूर्णा नदीच्या रेल्वे ब्रीजवर एका ४७ वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे.सदरील ईसम हा कोणत्यातरी रेल्वेच्या खाली सापडून मयत झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीसांनी घटनेची नोंद घेण्यात आली असून,मयत अनोळखी ईसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरी स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना खबर देऊन कळविले की,परभणीकडे जाणाऱ्या पूर्णा नदीच्या रेल्वे ब्रीजवरील खांब क्र.३१७/२५/२७ जवळ एक अंदाजे ४७ वर्षीय ईसम दोन्ही रेल्वे पटरीच्या मधोमध मृतावस्थेत पडलेला असल्याचे सांगितले. घटनेची माहिती प्राप्त होताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोहेकाॅ.डिगांबर राठोड, पोकाॅ.अविनाश डावरे, सुभाष चव्हाण, होमगार्ड प्रकाश वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.यावेळी पोलीसांनी त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले परंतु त्याची ओळख पटली नाही.पोलीसांनी त्यांचे अंगात काळा जिन्स,पांढरा-काळा शर्ट उंची ५ फुट २ इंच सडपातळ बांधा या वर्णनाचा ईसम कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेत मृत्यू पावला असल्याचे वर्णन जाहीर करुन लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालय परभणी येथे शीतग्रहात ओळख पटणेकामी ठेवण्यात आले असून,घटनेचा तपास पोहेकाॅ.राठोड करत आहेत.











