ॲग्रीस्टॅक’ योजनेच्या कामाची अंमलबजावणी करण्यास तलाठ्यांचा नकार
पूर्णेत तलाठी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
पूर्णा(प्रतिनिधी)
Agristack : राज्य सरकारने ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागासोबतच पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकीकडे प्रचलीत कामांचा व्याप आणि प्रलंबित कामांमुळे तसेच दुसरीकडे कृषी व पंचायत समिती विभागाचे काम करण्यास धजावत नसल्याने या प्रकल्पाची काम करण्यास तलाठ्यावरच भार पडत आहे सोबतच दबाबही वाढत आहे.जोपर्यंत शासन निर्णयानुसार संबंधित दोन्ही विभागाचे कर्मचारी तलाठ्यांच्या सोबत सहभागी होत नाहीत तोपर्यंत काम करण्यास तलाठ्यांनीही स्पष्ट नकार दिला असून, त्यांनी सोमवारी २८ रोजी तहसीलदार माधवराव बोथिकर यांना निवेदन सोपविले आहे.
शेतकऱ्यांना फार्मर आयडी, म्हणजेच डिजिटल ओळख देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ‘ॲग्रीस्टॅक’ची कामे त्यात शेतकऱ्यांची माहिती ही अधिकार अभिलेखात समाविष्ट करणे, गाव नकाशांचे जिओ रेफरसिंग करणे व जीआयएस आधारित रियल टाइम पीक पाहणी, या बाबीची प्रणाली विकसित करणे आदी कामे अॅग्रिस्टीक योजनेतून महसूल कृषी, पंचायत विभागास संयुक्तपणे करावी लागणार आहेत. मात्र येथिल कृषी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सदरील योजना ही आमच्या वर लादल्याचे सांगुन काम करण्यास नकार दिला आहे.आता या योजनेची काम करण्यास कामाचा अतीरीक्त व्याप वाढत असल्याने तसेच संबंधित दोन्ही विभागाचे कर्मचारी सहभागी होत नाही तोपर्यंत काम करण्यास महसूल विभागाच्या तलाठ्यानी देखील तहसीलदार माधवराव बोथिकर यांना निवेदन देऊन काम करण्यास नकार दिला आहे.निवेदनावर तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष खुशाल शिंदे,आर.पी.देसाई,के.एन धोंडगे, गणेश गोरे,एस.टी.राठोड,बी.एस. लटपटे, एम.एन.पठाण,अशोक तोंडे,फैजुल पठाण, एस.एस चेटले,आर.एच.आंदेलवार, आर.एस, गिराम,श्रृषिकेश चांदणे,आर.आर. सिंगरवाड, एसआर.दवणे,डी.पी. चिरपीलवार,ए.पी.कटके सह एम.डी.काळे,एस.ए.खुणे, एस,एस. ताकतोडे,एस.एम.मस्के,एस.एस.सरप आदीं तलाठ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.