खुनाच्या घटनेने गंगाखेड शहर पुन्हा हादरले
फुकटात चहा, सिगारेट देत नसल्याने चहा टपरी चालकाचा खुन;३ जाणां विरोधात गुन्हा दाखल
गंगाखेड(प्रतिनिधी)
मागील आठ दिवसांपासून सातत्याने एका पाठोपाठ एक होणा-या खुनांच्या घटनांमुळे गंगाखेड शहरात अक्षरशः भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून,ता.२२ एप्रिल रोजी खळी पाटी येथे प्रविण कौडकर नामक ५५वर्षीय इसमाचा कोयत्याने सपासप वार करून खुन केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आज मंगळवारी चहा सिगारेट फुकटात का देत नाही म्हणून तीन जणांनी चहा ठेले वाल्यांच्या बेदम मारहाण करून खुन केल्याची घटना दुपारी घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मयताचा मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती तुकाराम साळवे रा.गंगाखेड असं त्या मयत ईसमाचे नांव आहे.त्यांचा मुलगा अरविंद मारुती साळवे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार.तो आणी त्याचे वडील मारुती तुकाराम साळवे हे बस स्टॅन्ड च्या बाजूस असलेल्या रजा मज्जित जवळ असलेल्या हॉटेल वर सकाळी ५ ते १० पर्यंत असतात. २९ रोजी सकाळी ८ वाजता आरोपी आवेज खान गफार खान पठाण जुनेद जरावर खान हे दोघ हॉटेलवर पांढऱ्या रंगाची कार एम.एच.०९/ डीए/ २८५० या वाहनांवर आले. ते सतत चहा व सिगारेटचे पैसे देत नसल्याने माझ्या वडिलांनी त्यांना चहा व सिगरेट दिले नाही.नेहमीच असा त्रास माझ्या वडिलांना देत असल्यामुळे मी व वडिलांनी पाठीमागे पाठलाग केला असता दोघेही गोदावरी घाटावर चहा पीत थांबले होते.
त्यांना विचारणा केली असता त्यांनी पितापुत्रांला शिवीगाळ करून फिर्यादीचे वडीलांच्या पोटामध्ये लाथ घातली. छातीमध्ये व पोटामध्ये अवघड जागी लाथा बुक्क्यांनी मार मारले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अरविंद यास देखील मारहाण केली. यानंतर वडील जमीनीवर कोसळले असता त्यांना अरविंदने सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याचे वडीलांना मृत घोषित केले. यावरून आरोपी अवेज खान गफार खान पठाण, जुनेद जरावर खान, किशोर मंचक भालेराव या तिघांनी मार मारल्याने मारुती साळवे यांचा जीवगेला अश्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परिविक्षा दिन पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे हे करीत आहेत.