उपप्राचार्य प्रा.आबाजी खराटे प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

Spread the love

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न

पूर्णा ( प्रतिनिधी)

येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्यावसायीक प्रा.आबाजी नारायणराव कराटे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन दि.३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून, महाविद्यालयात त्यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आबाजी खराटे उच्च माध्यमिक व्यावसायिक या विभागातून नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर जेष्ठ संचालक दत्तात्रय वाघमारे ,श्री साहेबराव कदम, माजी प्राचार्य मनोहर सोनटक्के कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंदराव कदम,प्राचार्य डॉ. के. राजकुमार , यांच्या हस्ते आबाजी खराटे यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य , डॉ. शिवसांब कापसे, डॉ. गजानन कुरुंदकर पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी,कार्यालयीन अधिक्षक बी. पी. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाने श्री आबाजी खराटे यांचा यथोचित सत्कार केला, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या ,यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक आणि महाविद्यालयातील माजी सहकारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चारुदत्त डाफणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.दिशा मोरे यांनी केले

You cannot copy content of this page