दर्जाहीन रस्त्याच्या कामाला उपकार्यकारी अभियंत्यांनीच लावला ब्रेक.!
प्रजीमा-१० माटेगांव-आहेरवाडी रस्त्याचे काम दुसऱ्या वेळीही रोखले;कंत्राटदारा सह शाखा अभियंत्याची खरडपट्टी;उच्च प्रतिच्या रस्त्यावर साठी नागरिक आग्रही
पूर्णा/प्रतिनिधी
रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याची होत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी गेलेल्या सा.बां विभागाच्या उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांनी सुमार दर्जाचे काम पाहून कंत्राटदारासह शाखा अभियंत्यांचीही खरडपट्टी काढली.तसेच प्रचलीत नियमानुसार दर्जेदार काम होत नसल्याने जो पर्यंत कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या साहीत्याचा दर्जा सुधारत नाही तो पर्यंत सदरील कामाला ब्रेक लावण्याचे आदेश दिले आहेत.
पूर्णा तालुक्यातील (नावकी- आहेरवाडी-वडगांव-रिधोरा) प्रजीमा-१० रस्ता ३/०० ते ८/०० मध्ये, मजबुतीकरण, डांबरीकरण तसेच ओढे नाल्यावरील पुलांसह काँक्रीट रस्ता तयार करण्याचे काम सा.बां विभागाने हाती घेतले आहे.या कामांसाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.सदरील काम हे दोन टप्पे करुन वेगवेगळ्या कंत्राट कंपनीला विभागून देण्यात आले आहे.मागील एक ते दिड महिन्यांपूर्वी हे काम सुरू झाले आहे. वरील कामाचे कंत्राटदार कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत आहेत.शिवाय थातुरमातुर पद्धतीने काम करत आहेत.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हे काम ता.१४ एप्रिल रोजी रोखले होते.दरम्यान काही दिवस सदरील काम बंद राहील्याने सा.बां विभागाच्या शाखा अभियंता यांनी मध्यस्थी करून दर्जेदार काम करण्याची हमी दिल्याने ते काम पुन्हा एकदा सुरू केले होते.परंतु थातुरमातुर काम करुन शासनाच्या लाखों रुपयांवर डोळा ठेवून बसलेल्या कंत्राट कंपनी सुदरेल ती कंपनी कशी.मात्र पाहीले पाढे पंचावन्न करणा-या कंत्राटदाराची स्थानिक नागरिकांनी दर्जेदार काम होत नसल्याने आता उपकार्यकारी अभियंता यांना तक्रार केली.ता.३० रोजी सदरील कामाची पाहणी पूर्णा सा.बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांनी केली. यावेळी त्यांना खरोखरच रस्त्यांची काॅलेटी सुधरलेली नाही हे लक्षात आले.कामावर खराब गिट्टीचा, वापर, कामात डांबराचा कमी वापर, दिसताच त्यांनी शाखा अभियंता तसेच कंत्राटदारास जोपर्यंत.उच्च प्रतिचे दगड टाकुन फोडून त्यांचा वापर करत प्रमाण न चुकवता डांबराचा वापर होत नाही तो पर्यंत सदरील काम ब॓द करण्याचे आदेश दिले.यावेळी उपकार्यकारी अभियंता देशपांडे यांनी संबंधित कंत्राटदाराला दर्जेदार काम नाही झाल्यावर कार्यवाही चे संकेत दिले आहेत.तसेच सदरीलकाम हे विभागाच्या प्रचलीत नियमानुसार करवून घेण्यात येईल असे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी.पं.स.सदस्य छगनराव मोरे, सुभाष मोरे,सोपान मोरे,स॓भाजी मोरे,च॓द्रका॓त मोरे,राम पि॓परणेसह परिसरातील आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.
कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी
प्रजीमा क्र.१० आहेरवाडी रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने दोन वेळा बंद पाडण्यात आले असुन,सदरील उर्वरित कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.संबंधित विभागाने संबंधित कंत्राटदारांकडून काम दर्जेदार पणे पुर्ण करुन घ्यावे अन्यथा त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा यापुढे शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.
-छगनराव मोरे
मा.पंचायत समीती सदस्य पूर्णा