आ.डॉ.रत्नकर गुट्टे मित्र मंडळाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अँड राजेश भालेराव
पूर्णेत उबाठाला धक्का;नगरसेवक भालेराव यांच्या सह खुजडा सरपंच, उपसरपंच कार्यकत्यांनी केला जयमहाराष्ट्र
पूर्णा ( प्रतिनिधी)
पूर्णा पालीकेचे शिवसेना उबाठाचे नगरसेवक अँड राजेश भालेराव यांनी ता.३० एप्रिल रोजी उबाठाला जयमहाराष्ट्र करत आपल्या कार्यकर्त्यांसह आ. डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला असून, अँड भालेराव यांची मित्र मंडळाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकी नंतर गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.अनेक पदाधिकारी कार्यकर्ते पक्षांतरण करत आहेत .३० एप्रिल रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा पालीकेचे शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक अँड राजेश भालेराव,खुजडा गावचे गावाचे सरपंच नंदकुमार भालेराव उपसरपंच आच्युत नागोराव कू-हे, संतोष महाजन, पठाण, गजानन कु-हे, यांच्या सह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.आमदार डॉ .रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णा शहरात मित्र मंडळाच्या शहराध्यक्षपदाची धुरा अँड राजेश भालेराव यांच्या खांद्यावर सोपवली आहे.त्यांना निवडीचे पत्र देऊ केले आहे.याप्रसंगी मित्र मंडळाचे नितीन उर्फ बंटी कदम, माधवराव गायकवाड, संतोष सातपुते, साहेब भाकरे, विशाल उर्फ ब्राॅक आदीं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उभयतांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.