९ वर्षीय चिमुकल्याचा विहीरी बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू

Spread the love

पूर्णा तालुक्यातील वाई(लासिना) येथिल घटना;चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद.

पूर्णा(प्रतिनिधी)

विहिरीच्या पाण्यात बुडुन एका ९ वर्षीय चुमकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील वाई (लासीना) येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

      राजकुमार उर्फ चिकु माणिक डाखोरे वय ९ वर्षे रा.वाई(लासिना) ता.पूर्णा जि.परभणी असं त्या मयत चिमुकल्याचे नांव आहे.गुरुवारी १ मे रोजी दिवसा गावात एक विवाह सोहळा होता.यात चिकु पंक्तीमध्ये जेवण वाढण्यासाठी गेला होता.बराच वेळ तो लग्नात रमला.रात्री उशीरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सायंकाळी पाच वाजे सुमारास चिकुचे कपडे वाई शिवारातीलच एका विहिरीजवळ त्याचे अंगावरील शर्ट कपडे आढळून आले. कपडे विहीरीजवळ दिसताच त्याच्या  आईवडिलांनी  एकच आक्रोश केला. येथिल ग्रामस्थांनी विहिरीमध्ये उडी मारून चिकुचा शोध घेतला.अखेर राजकुमार याचा मृतदेह विहिरीत आढळून आला.प्रसंगी हृदयद्रावक घटना पाहून  ग्रामस्थांचेही डोळे पाणावलेले पहावयास मिळाले.चिकुच्या पार्थिवावर रात्री ८ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याघटनेची नोंद चुडावा पोलिसांनी केली आहे.

You cannot copy content of this page