बुद्ध जयंती निमित्त पूर्णेत रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जयंती निमित्त पूर्णा शहरात आयोजित रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सकाळच्या सत्रात सुमारे ५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

पूर्णा बुद्ध विहारात बुद्ध विहार समीती व मिलींद कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवार ता.१२ रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराचे उद्घाटन व.ना.कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमीणा, शास्त्रज्ञ प्रा.डॉ.निता गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो, भंते पय्यावंश यांच्या सह प्राचार्य राम धबाले, प्रा.डॉ.विलास खर्गखराटे चक्रवर्ती वाघमारे,राहुल वाघमारे व मुख्य संयोजक मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सामुहिक महावंदनेच्या कार्यक्रमानंतर रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली.यावेळी सकाळच्या सत्रात सुमारे ५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आहे.यावेळी श्री गुरु गोविंदसिंगजी ब्लड बँकेच्या व्यवस्थापक कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page