नगरपालिकेत लाचलुचपत विभागाची धाड;१० हजार घेताना दोघांना पकडले

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल पालीकेच्या नामांतर बांधकाम विभागात मंगळवारी ता. १३ रोजी दुपारच्या वेळी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड घातली.यावेळी घराचे नामांतर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना पालीकेचे नरहरी सातपुते व कंत्राटी कर्मचारी रत्नदिप वाघमारे या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे.

पूर्णा पालीकेत मागील तीन ते चार वर्षांपासून प्रशासक सुरू आहे.त्यामुळे पालीकेच्या सर्वच विभागांत चिरीमिरी दिल्या खेरीज काम होत नाही. त्यापैकी नामांतर व बांधकाम विभागाने तर चिरीमिरी घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम सुरू केला आहे.कोणत्याही कामांसाठी १० ते १५ हजारांहून अधिक रक्कम घेतल्या शिवाय सर्वसामान्य नागरिकांचे कामच होत नसल्याने शहरातील नागरिक देखील अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. अशाच पद्धतीने भिमनगर भागातील रहिवासी असलेल्या एका विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरास आपल्या घराचे नामांतर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी होती.त्याने आपले काम करुन घेण्यासाठी नामांतर विभागातील बाबु नरहरी सातपुते यांना पैसे द्यायचे मंजुर केले.याबाबत परभणी लाच लुचपत विभागाकडे त्याने एक तक्रारही दाखल केली होती.ठरल्या प्रमाणे मंगळवारी ता.१३ रोजी या विभागाच्या पोलीस उपाअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बसवेश्वर जगीकोरे, पोलीस अंमलदार जीबराईल शेख, अतुल कदम श्याम बोधनकर चालक नरवाडे यांच्या समक्ष लाच देण्यासाठी तक्रार दारास घेऊन पालीकेत गेले त्यांनी सातपुतेस पैसे देत असताना त्याने आमच्या कंत्राटी कर्मचारी वाघमारे यांच्या जवळ ही रक्कम देण्यास सांगतले .लाचेची रक्कम देताच सोबत असलेल्या पथकाने दोघांना पकडून त्या नंतर लाचलुचपत विभागाने त्यांच्या घराची देखील झडती घेतली मात्र त्यांना काय मिळून आले हे मात्र नक्की समजू शकले नाही.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात पूर्णा पालीकेच्या नामांतर विभागातील नरहरी सातपुते व कंत्राटी कर्मचारी रत्नदिप वाघमारे या दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास परभणी लाचलुचपत विभाग करत आहे.

You cannot copy content of this page