पालिकेने केलेली मालमत्ता करवाढ रद्द करा-पूर्णेत आ.डॉ.गुट्टे मित्र मंडळाची मागणी

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

पालीकेने मालमत्ता कराची केलेली दरवाढ तातडीने रद्द करुन नव्याने करवाढ करावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम,शहराध्यक्ष राजेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार १९ में रोजी पालीचा प्रशासनास निवेदन देण्यात आले.

      पूर्णा शहरात सध्या नगर पालीका हद्दीतील मालमत्ता कराची फेररचना करण्यात आली असून, शहरातील रहीवाशी, व्यापारी,उद्योग,शासकीय कार्यालयांना पुढील वर्षी करीता मालमत्ता कराची दरवाढ करण्यात आली आहे. न. प.एकत्रित मालमत्ता कर नियम १९६९ तथा न.प. अधिनियम १९६५ च्या तरतुदीच उल्लंघन करून नगरपरिषद कमाल व किमान वाढ विचारात न घेता केवल कमाल धारने पेक्षा करवाढ केलेली ही जनविरोधी आहे .त्यात  आपण दिलेल्या नोटीस वर आक्षेप घेण्यासाठी घातलेल्या अटी ह्या जनविरोधी असून आक्षेप अर्जा सोबत घरपटी व PTR ची प्रत देण्याचे बंधनकारक न करता आक्षेप मालमत्ता धारक यांच्या कडून स्वीकारण्यात यावे. मूल्यनकण तक्ता प्रपत्र क्रमांक १ हे करवाढ करण्या अगोदर प्रत्येक मालमत्ता धारकाकडून स्वीकारण्याचे बंधनकारक असताना ते केलेले नाही म्हणून करवाढ ही रद्द करावी.

नगर परिषद हद्दीमधील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या (सीमा सुरक्षा बल) सैनिकांच्या मालमत्तेला कर माफ करण्यात यावा.

नगर परिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तीच्या मालमत्तेला मालमत्ता कर माफ करण्यात यावा.मालमत्ता धारकांची मोकळी जागा तथा कर लावन्या पासून वगळण्यात येणाऱ्या मालमत्ता चा भाग न वगळून सरसकट (PTR) प्रमाणित करवाढ अयोग्य व जनविरोधी आहे. म्हणून दिलेल्या नोटीस परत घ्यावे.

वापरात नसलेल्या इमारती यांना कर नोटिस दिल्या आहेत व इमारती / मालमत्ता किती वर्ष जुने नवीन यांची खातर जमा न करता नवीन मालमत्ता दर अवास्तव दाखवून करवाढ केलेली अमान्य आही.इमारती निवासी असताना वाणिज्य करवाढ केलेली आहे..प्रचलित READY RECORNAR व झोन ही चुकीच्या पद्धतीने दर्शवून करवाढ झालेली रद्द करावी व पुन्हा झोन हे फेर तेथील रहिवाशी व राहणीमान आर्थिक परिस्थिति विचारात घेवून करवाढ ठरवलेली नसल्याने ती रद्द करण्यात यावी.करवाढ करताना शिक्षण व पर्यावरण कर तथा पणीपटी अवास्तव पणे कायद्याच्या नियमाच्या विरुद्ध असून जनतेच्या हिताच्या द्रष्टिने अन्याय कारक आहे.

या निवेदणा द्वारे पूर्णा येथील नगर परिषद धारकांचा आक्षेप नोंदवून त्या वर आपील समिति नोंदवून आक्षेप आर्जवर सुनावणी घेवून करवाढ रद्द करावी अन्यथा आम्ही या विरुद्ध तीव्र जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.निवेदनावर प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, शहराध्यक्ष अँड.राजेश भालेराव तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई , साहेबराव भाकरे,देवा कदम, अँड गोविंद ठाकूर, विश्वनाथ होळकर, विशाल कांबळे, श्रीनिवास तेजबंदउत्तमराव ढोणे, किशोर सुर्यवंशी , रमेश सुर्यवंशी ,सदाशिव चापके,व्यंकट मोरे, सुदर्शन ढोणे, गोपाळ बोबडे,फेरोज पठाण राजेश देसाई,सह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

You cannot copy content of this page