शिवसेना शिंदे गटाच्या तिरंगा रॅलीला प्रतिसाद

Spread the love

जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्याद्वारे आयोजन, : हजारो युवकांचा सहभाग

परभणी(प्रतिनिधी)
 भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी परभणी शहरातून जोरदार तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.
       शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. ही रॅली वसमत रस्तामार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक,  उड्डाणपूल, विसावा चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचली. येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेवटी राष्ट्रगीताने बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
       या तिरंगा बाईक रॅलीत जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम,माजी खासदार सुरेशराव जाधव, लोकसभा प्रमुख राजू कापसे, भास्करराव लंगोटे, महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, प्रल्हाद होगे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपटे, तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे, युवासेना शहर प्रमुख ईशान अवचार, युवासेना उपशहर प्रमुख राहुल शिंदे, सखुबाई लटपटे, कल्पना दळवी, अर्चना चिंचाणे, शीलाताई शेटे, पूजाताई शेटे, युती जिल्हाप्रमुख प्रीती घुले, शेख शबीर, सचिन पाटील, बाळासाहेब मोहटे, कैलास पांगरकर, महेंद्र जोंधळे, भूजंगराव धस, संदीप जाधव, सरपंच उद्धवराव गायकवाड, संजय बेटकर, गुलाबराव पंढरकरून, अजित गरुड, गोविंदराव जोगदंड, शिव प्रसाद लोखंडे, लक्ष्मण आरमाळ, उमाकांत भरोसे, पप्पू खुळे, सुभाषराव गरुड, बंडू झाडे, ज्ञानेश्‍वर रसाळ, ज्ञानेश्‍वर शिंदे आदींसहीत शहरातील महिला, युवक - युवतींनी मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभाग घेतला.

You cannot copy content of this page