Summer Special; नांदेड-मुंबई १८ डब्ब्यांची विशेष रेल्वे धावणार
नांदेड रेल्वे विभागाकडून प्रवाशांची सोय; जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची माहिती पूर्णा(प्रतिनिधी)
उन्हाळी सुट्यात मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना नांदेड रेल्वे विभागाने मोठा दिलासा दिला असून, सुट्टीत रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी,आरक्षीत तिकीटासाठी होणारी गैरसोय लक्षात घेत नांदेड-मुंबई(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) ही १८ डब्ब्यांची Summer Special विशेष रेल्वे आज ता.२४ में शनिवार पासून चालवण्याचा निर्णय घेतला असून हया गाडीच्या प्रायोगिक तत्त्वावर दोन फेऱ्या होणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविले आहे.
नांदेड रेल्वे विभागातील परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून विकेंड साजरा करण्यासाठी मुंबई, पनवेल, आदीं महानगरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.दरम्यान विभातुन दैनंदिन धावणा-या गाड्यांना मोठी गर्दी होते.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड विभातुन ता.२४ रोजी नांदेड- मुंबई विशेष रेल्वे दोन फेऱ्यात चालवण्यात येणार आहे.रेल्वे विभागाने याबाबत गाडीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
गाडी क्रमांक ०७०५९ हुजूर साहिब नांदेड -मुंबई(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) विशेष गाडी दिनांक २४ मे शनिवारी रात्री ११ वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटून पूर्णा, परभणी,मानवत रोड, सेलू,परतूर, औरंगाबाद,लासूर,रोटेगाव,नगरसोल, मनमाड,नासिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रविवारी दुपारी २:३०वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी ता.२५ में रोजी रविवारी दु.३;५० वाजता सुटून सोमवारी पहाटे ६;३० वाजता पोहोचेल.ह्या गाडीस जनरल, स्लीपर, वातानुकूलित असे १८ डब्बे असणार आहेत.यागाडीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी केले आहे.