आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा डंका राहील-आंबादास दानवे
परभणी(प्रतिनिधी)
राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा डंका राहील असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे.
परभणी शहरातील सावली विश्राम गृहात ता.२४ में रोजी शुक्रवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी अंबादास दानवे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.बैठकीस शिवसेना उपनेते खा.संजय उर्फ बंडू जाधव,डॉ.विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव,पैहलवान मारोतराव बनसोडे, सुधाकर खराटे, दशरथ भोसले, सह पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, युवासेनेचे शिवसेनेचे शहरप्रमुख उपशहर,तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख,सर्कल प्रमुख आदीं जिल्हाभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खा.संजय जाधव, डॉ. नावंदर,आणेराव यांनी आपले विचार मांडले.पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, जगातील एकमेव पक्ष ज्याच्याकडे ‘शिवसैनिक’ नावाची ताकद आहे. त्यामुळे पक्षाच्या यशाचा डंका जिकडे-तिकडे वाजल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त केला.येत्या काही महिन्यांत महापालिका ,नगरपालीका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीत आप आपसातील वाद बाजूला सारून एकदिलाने काम केले तर निश्चितपणे आपल्या शिवसेनेचीच घोडदौड होईल. त्यासाठी ताकदीने कामाला लागावे लागेल, हा संदेश अंबादासराव दानवे यांनी यावेळी बोलताना दिला.प्रसंगी शिवसैनिकांचे, पदाधिकाऱ्यांचे विविध विषयातील मत जाणून घेतले. त्यांच्या भावना देखील त्यांनी समजून घेतल्या.