मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी परभणी दौऱ्यावर

Spread the love

परभणी, दि.२८ प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार, दि. 29 मे 2025 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.दि. 29 मे रोजी सकाळी 10.55 वा. मुंबई येथून विमानाने
नांदेड येथील विमानतळावर आगमन. सकाळी 11.00 वा. हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 11.20 वा.मोटारीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीकडे प्रयाण. सकाळी 11.25 वा. सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आगमन. सकाळी 11.30 वा. संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक-2025 चे उद्घाटन तसेच परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दु. 12.40 वा. मोटारीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणीकडे प्रयाण. दु. 12.45 वा. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे आगमन. दु. 12.45 वा. जाहीर सभा.दु. 1.45 वा. मोटारीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील हेलिपॅड येथे प्रयाण. दु. 1.55 वा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील हेलिपॅड येथे आगमन. दु. 2.00 वा. हेलिकॉप्टरने ते हिंगोलीकडे प्रयाण करतील.


You cannot copy content of this page