परभणीत आज मुख्यमंत्री फडवणीस; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड
परभणी(प्रतिनिधी)
परभणीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणीत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्यात काही व्यत्यय येऊ नये यासाठी आज गुरुवारी (दि.29) सकाळपासूनच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.
आज सकाळी सहा वाजता शेंद्रा (जुना) येथील किशोर ढगे यांच्या घरी जावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर गोविंद गिरी यांना देखील ताब्यात घेत मोंढा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. ताडकळस पोलीसांनी उमेश देशमुख यांना सकाळीच ताब्यात घेतले. आज जिल्ह्यात सगळीकडेच पोलिसांनी चळवळीतील कार्यकर्त्याची धरपकड सुरू केली.