२१ वर्षीय युवकाची गळफास लाऊन आत्महत्या
परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील घटना;पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
पूर्णा ता.३१ मे (प्रतिनिधी)
परभणीच्या ताडकळस गावात एका २१ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून, सदरील युवकाने कशामुळे गळफास लावला हे मात्र नक्की समजू शकले नाही.याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात शनिवारी ३१ मे रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बालाजी अशोकराव घाटोळ (वय २१) वर्षे रा.शंकरनगर ताडकळस ता.पूर्णा जि.परभणी असं त्या मयत युवकांचे नांव आहे.शुक्रवारी ३० रोजी रात्री बालाजी आपल्या खोलीत झोपला होता.मध्यरात्री रात्री १ वाजेच्या सुमारास तो घरात पंख्याला साडी बांधुन गळफास लावलेल्या अवस्थेत कुटुंबीयांना निदर्शनास आला. मयताचे भाऊ.कैलास घाटोळ यांनी घटनेबद्दल ताडकळस पोलीसांना खबर दिली.घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी मृतदेह जमीनीवर उतरुन रितसर पंचनामा करत उत्तरीय तपासणीसाठी ताडकळस प्रा.आ.केंद्रात दाखल केला.उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.याप्रकरणी मयताचा भाऊ कैलास घाटोळ यांच्या खबरीवरुन ताडकळस पोलीसांनी घटनेची नोंद केली आहे.