अहिल्यादेवींचा आदर्श जोपासावा-खा.संजय(बंडु)जाधव
पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी
पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी)
Ahilya Devi Holkar Jayanti : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी देशभरात शेकडो मंदिर, तिर्थस्थळांचा जीर्णोध्दार करतानाच राज्यकारभाराचा गाडाही अतिशय कुशलतेने चालवून राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श अहिल्यादेवींनी घालून दिला. जिल्ह्यातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी सुध्दा अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श जोपासावे असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते तथा परभणी जिल्ह्याचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी केले.
पूर्णा तालुक्यातील मौजे पिंपळगाव (बा) येथे समाजबांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी खा.जाधव बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,परभणी येथे समाजास भुषवाह होईल असा आहील्यामातेचा पुतळा उभारण्यात येईल .त्यासाठी परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्यासाठी जातीने लक्ष देणार असल्याचे सुतोवाच यावेळी खा.जाधव यांनी केले.यावेळी खा.जाधव हस्ते श्रीफळ वाढवून भव्य शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ट नागरीक माणिकराव बनसोडे, प्रसंगी नुतन भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,रेखाताई रत्नाकर गूट्टे,अनंता बनसोडे, हभप राम महाराज बनसोडे, जलील पटेल, बालाजी वैद्य,आप्पा बनसोडे, बाजीराव बनसोडे,ज्ञानोबा बनसोडे,धनराज बनसोडे, आदीनी अभिवाद केले.यावेळी आनेक मान्यवरांचे पिंपळगांव बाळापुर समस्त गावकरी मंडळाच्या वतीने भव्य सत्कार केला असुन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आनेक मान्यवरांनी प्रकाश टाकला.या दरम्यान सायंकळी चार वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गांवातुन भव्य तैलचित्राची मिरवणुक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत येलकोट,येलकोट जय मल्हार समाजाने जयघोष केला.यावेळी गांवातुन सायंकळी दिंडीचे ही अयोजन केले होते.यावेळी दरम्यान हजारों भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असुन या जयंती कार्यक्रमाला यशस्वीसाठी जयंती समितीचे मुक्तीराम बनसोडे,उपाध्यक्ष नवनाथ बनसोडे,सचिव दिपक बनसोडे,सुदाम बनसोडे,सहसचिव लक्ष्मण बनसोडे,बळीराम बनसोडे, कोषाध्यक्ष मंगेश बनसोडे,अनिल गलांडे, सहकोषाध्यक्ष गणेश बनसोडे,शाम बनसोडे आदींनी परिश्रम घेतले असुन यावेळी पिंपळगांव बाळापुर समस्त गावकरी व महिला, नागरीक व युवक मोठया संख्येने उपस्थित होती.












