निजामुद्दीन,छपरा, तिरुपती एक्सप्रेसचे डबे कायमस्वरूपी वाढवले
पूर्णा ता.४ जुन(प्रतिनिधी)
दमरेच्या नांदेड विभागातुन धवणा-या नांदेड-निझामुद्दीन,जालना-छपरा एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस रेल्वे गाड्यांत वेटींग लिस्ट मुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर वातानुकूलित,शया डब्यांची संख्या वाढवली होती.वाढवण्यात आलेल्या डब्यांस प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या डब्यांना कायम स्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे.
निझामुद्दीन एक्स्प्रेस मध्ये ४ डब्यांची वाढ, जालना छपरा एक्स्प्रेस मध्ये २ डब्यांची वाढ आणि तिरुपती-श्री साईनगर शिर्डी विशेष एक्स्प्रेस मध्ये २ डब्यांची वाढ कायम स्वरुपात करण्याचे ठरविले आहे, गाडी क्रमांक १२७५३/५४ नांदेड-निझामुद्दीन-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस १० जून पासून या वाढीव डब्यांसह धावणार आहे.यावाढी नंतर या गाडीला डब्यांची एकूण संख्या २२ झाली आहे. तर गाडी क्रमांक०७६५१/५२ जालना-छपरा-जालना एक्स्प्रेस मध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीतआणि एक द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर) असे दोन डब्बे 04 जून पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या आता २४ झाली आहे. तसेच गाडी क्रमांक ०७६३७/०७६३८ तिरुपती-श्री साईनगर शिर्डी- तिरुपती विशेष गाडी मध्ये दोन द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर) चे डब्बे ८ जुन पासून जोडले जाणार आहेत.या गाडीस आता १९ डबे असणार आहेत. अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे.