दुचाकी चोरणारी टोळी परभणी पोलिसांनी केली जेरबंद
१० मोटारसायकल सहीत पाच आरोपी ताब्यात
परभणी(प्रतिनिधी)
मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश
करत एकूण १० मोटारसायकलीसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
शहरासह जिल्हयातील मोटारसायकल चोरी करणान्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील यांना आदेशित केले होते. यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक शोध घेत असतांना नानलपेठ पोलीस ठाणे अंतर्गत चोरी गेलेल्या मोटार सायकली शहरातील अरुण उत्तम कांबळे (वय १९) रा. प्रकाश आंबेडकर नगर, धार रोड व त्याचे साथीदार मोहन श्यामराव नवघरे वय रा. जिजामाता रस्ता, मल्हारी उर्फ हरी लक्ष्मण कसबे (वय १९) रा. महात्मा गांधी नगर धार रोड, नागेश रामदास पुरे वय रा. बालूर ता. सेलू यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नानलपेठ पोलीस ठाणे, नवा मोंढा पोलीस ठाणे, चुडावा पोलीस ठाणे व ताडकळस पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हयातील एकूण ९ मोटारसायकलीसह (अंदाजे किंमत ९ लाख २० हजार रुपये) नानलपेठ पोलिस ठाणे येथे आरोपींना हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरिक्षक राजु मुत्येपोड़, अंमलदार मधुकर चट्टे सुग्रिव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, रवी जाधव, सुर्यकांत फड, लक्ष्मण कांगणे, निलेश परसोडे, रफियोदीन शेख, परसराम गायकवाड, दिपक मुदीराज, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, रंजीत आगळे आदींसह सायबर पोलिस ठाण्याचे गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली.जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल्स याप्रमाणे-नानलपेठ पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हयातील रॉयल एन्फील्ड बुलेट, होन्डा, शाईन, बजाज पल्सर, हिरो स्पेलंडर प्लस, बजाज पल्सर, हिरो स्पेलेंन्डर प्लस, ताडकळस पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हयातील हिरो स्पेलेन्डर प्लस, नवा मोटा पोलीस ठाणे गुन्हयातील बजाज, पल्सर आणि चुडावा पोलीस ठाणे अंतर्गत हिरो स्पेलेन्डर प्लस आदी मोटारसायकलचा समावेश आहे.
___________











