राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये ७६ लाखांची फसवणूक १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Spread the love

परभणी ता.११(प्रतिनिधी) : येथील मध्यवस्तीतील राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कच्छी बाजार शाखेने जास्त व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ७६ लाख ३५ हजार ४७९ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल नानलपेठ पोलिस ठाण्यात या मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह १४ जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत.

या मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीच्या कच्छीबाजार शाखेद्वारे गुंतवणूकधारकांना १२ ते १३ टक्के व्याजदराचे आमिष दाखविले जात होते. त्यामुळे काही गुंतवणूकधारकांनी जादा व्याजाच्या आमिषापोटी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यातच अनिल आरबाड नामक सेवानिवृत्त कर्मचार्‍याने सेवानिवृत्ती नंतर मिळालेली संपूर्ण रक्कम या मल्स्टिस्टेच्या शाखेत गुंतवली. परंतु, सुरुवातीच्या काळात काही महिने परतावा मिळाल्यानंतर लाभ बंद करण्यात आला. त्याबाबत आरबाड यांच्यासह अन्य गुंतवणूकधारकांनी संपर्क साधला तेव्हा या खातेदारांना उडवा उडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळेच आपली शुध्द फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर २१ गुंतवणूकदारांनी नानलपेठ पोलिस ठाणे गाठून या मल्टिस्टेटचे अध्यक्षांसह एकूण १४ जणांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी मस्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद्र लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, अजय पुजारी, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेवराव रोडे, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी व परभणीतील शाखा व्यवस्थापक गोपी सोमानी यांच्याविरुध्द फसवणूकीचे गुन्हे दाखलकेले आहेत.

You cannot copy content of this page