संपतीचा वाद विकोपाला गेला दहीखेडचा महाविर जिवनीशी गेला
सोनपेठ पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल
परभणी/प्रतिनिधी
आजोबाच्या संपत्तीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील दहिखेड शिवारात मंगळवारी (दि.10) सायंकाळी घडली. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, मावस भावांमध्ये आजोबाकडून मिळालेल्या वाडा व इतर संपत्ती वाटणीच्या कारणावरुन मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान मंगळवारी महावीर सोट याच्या घरी संपत्ती वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली. यावेळी बैठकीत महावीर असलेल्या वाड्यामध्ये अर्धा वाडा वाटून देण्याचे सर्वानुमते ठरले. त्यामुळे वाद मिटला. काही वेळाने समाधान बर्वे, दत्ता बर्वे यांनी वाद मिटल्याचे सांगून महावीरला शेतात नेले. या ठिकाणी शेतीच्या व वाड्याच्या वाटणीच्या कारणावरुन धारदार शस्त्राने महावीरचा मारहाण करून खून करण्यात आला.
या प्रकरणी समाधान सुर्यकांत बर्वे, दत्ता गंगाधर बर्वे, सुर्यकांत बाबुराव बर्वे, पार्वतीबाई सुर्यकांत बर्वे, इंदुमती गणपत बर्वे, शुभम गणपत बर्वे, राजाराम अनंता बर्वे, इश्वर अनंता बर्वे यांच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहायक पोलिस उपनिरिक्षक विनोद चव्हाण यांनी भेट दिली. मयत महावीर सोट याचे ग्रामीण रुग्णालयात डॉ. भरत चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण करत आहेत.
_____________