श्री.गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे परभणी जिल्ह्यात आगमन

Spread the love

पूर्णा तालुक्यातील झिझोफाटा, भारतीकॅम्प परिसरात जल्लोषात स्वागत;स्वागतासाठी महंत शिवानंद महाराज, जि.प्र विशाल कदम यांची उपस्थिती..

पूर्णा (प्रतिनिधी)/१५ जून

शेगावी संत श्री गजानन महाराजांचा  भव्य पालखी सोहळ्याचे आज रविवारी परभणी-हिंगोली जिल्हा सीमेवरून पुर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे आगमन झाले.यावेळी भारतीकॅम्प परिसरात श्रींच्या पालखीचे महंत शिवानंद महाराज, यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम,रितेश काळे, राजेश लोहीया,पिंटु काळे,संजय लोहीया, सरपंच माणीकराव भालेराव,डिवाएसपी समाधान पाटील पो.नि. विलास गोबाडे,शंकर गलांडे, गजानन हिवरे,दौलत भोसले, जगदीश जोगदंड, अशोक अग्रवाल, डॉ.गिरीष जैस्वाल ,मनिष काळे, प्रल्हाद काळे, किशन काळे, सरपंच श्रृषी मोरे,दत्ता कदम,रवि कदम प्रा.गंगाधर खाकरे ,प्रा.आबाजी खराटे, पोलीस पाटील ज्ञानोबा यांची उपस्थिती होती.पालखी सोहळ्या च्या आगमना निमीत्ताने फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी काढुन सजावट करत पुष्प अर्पण करून भव्य स्वरुपात स्वागत करण्यात आले..

     शेगांव येथुन पंढरपुरास निघालेल्या शेगावीराणा  ‘श्रीं’ गजानन महाराजांच्या ५६ व्या दिमाखदार पालखी सोहळा आपल्या ७०० वारकरी,४ अश्व,९ वाहने रुग्णवाहीका, डाॅक्टर,सेवेक-यांच्या मोठ्या लव्या जम्यासह रविवारी१५ जून रोजी दुपारी २ दिड वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्याच्या सिमेवर झिरो फाटा येथे आगमन झाले. एरंडेश्वर ,भारती कॅम्प, परिसरातील महीला व नागरिकांनी श्रींच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती. भारती कॅम्प येथे आगमन झाल्यानंतर दिंडीचे स्वागत व पुजनानंतर भाविकांनी तसेच

         गजानन महाराज मंदिर संस्थान मानवत व एरंडेश्वर येथिल भक्त गणू   यांच्या वतीने महाराजांच्या सेवार्थ चहापान अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पो.नि विलास गोबाडे, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पालखी नांदगाव,राहटी पाटी मार्गाने  दु ३:३० वाजता पुढील मुक्कामी श्रीक्षेत्र त्रिधारा वाडी कडे मार्गस्थ झाली.सोमवारी १५  रोजी ‘श्रीं’ चा पालखी सोहळा परभणी शहरात दाखल होणार असल्याचे समजते.

You cannot copy content of this page