पूर्णा तालुक्यात शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेश उस्तव’ म्हणून साजरा-कुठे बैलगाडी मिरवणुक तर कुठे जनजागृती रॅली

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

नव्या क्षैक्षणीक वर्षाला सुरुवात झाली असून,आज सोमवारी शाळेचा पहिला दिवस येथिल शिक्षण विभागाने ‘प्रवेशउस्तव’ म्हणून साजरा केला यावेळी  निवासी जिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी,जि.प.च्या उपमुख्यकार्यकारी रेखा काळंम,उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे,गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माटेगांव येथे बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक तर महागाव,एरंडेश्वर,कात्नेश्वर देऊळगांव दुधाटेसह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी विवीध उपक्रम राबवत शाळेचा प्रवेश दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.      

      पूर्णा तालुक्यातील माटेगांव येथे आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून व इतर विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या, पेन, पुस्तके आणि अन्य शालेय साहित्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक पालक, सामाजिक कार्यकर्ते शिक्षकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्या बालकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये व खाजगी शाळांमध्ये प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. या मध्ये नविन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११२ शाळा व खाजगी अनुदानित ४८ शाळा यां शाळांमधील एकूण विद्यार्थी २१ हजार ६३३ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा मधून मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आला. प्रवेशपात्र विद्यार्थी यांना पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. एकंदरीत शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठस्तरावरुन शासन निर्णयातील तरतूदीनुसार वरिष्ठ अधिकारी यांनी शाळेला भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये, मा.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी मॅडम, श्रीमती रेखा काळंम पाटील महिला व बालकल्याण (उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.परभणी), कृषी विस्तार अधिकारी डॉ. सामाले, डॉ पांचाळ (आरोग्य अधिकारी) श्री. कचरे आर डब्लू, श्री गजानन वाघमारे (उपशिक्षणाधिकारी जि.प.परभणी) गटशिक्षणाधिकारी (पं.स.पुर्णा), विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, कार्यालयातील सर्व विषयतज्ज्ञ, IED विशेष शिक्षक यांनी शाळेला भेटी दिलेल्या आहेत. सर्वत्र शाळा नियोजित व्यवस्थापन करुन सुरु झालेल्या आहेत.तालुक्यात राबविण्यात आलेल्या या प्रवेश उस्तव कार्यक्रम यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागातील व्यंकट रमण जाधव  ……आदींनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page