१५ जुलैपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून घ्या-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

Spread the love

पूर्णा ता.२५( प्रतिनिधी)•परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास त्यांना शून्य टक्के व्याजाने नव्याने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे अन्यथा जास्त व्याज दर भरावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ जुलैपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते थकबाकीमध्ये जावू नये. ते थकबाकीमध्ये गेल्यास शेतकऱ्याचा क्रेडिट रिपोर्ट खराब होतो. शेतकऱ्यांनी पीक कर्ज वेळेत नूतनीकरण केल्यास त्यांना दीर्घ मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, बचत गटासाठी कर्ज, किंवा इतर कुठलेही कर्ज मिळवताना कोणतीही अडचण येत नाही. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे आहे.
सर्व बँकांनी कॅलेंडर तयार केले असून, त्या बँक शाखा त्या-त्या दिवशी गावात येणार आहे त्यादिवशी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन नूतनीकरणाचा अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page