नांदेड रेल्वे विभागातुन आषाढी एकादशीला ६ फे-या

Spread the love

नगरसोल,अकोला, आदिलाबाद स्थानकावरुन सोडणार विशेष रेल्वे; पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय

पुर्णा ता.२९(प्रतिनिधी) पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारी निमित्त भरणा-या यात्रा महोत्सवासाठी आहे. नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने ता.५ जुलै पासून वारकर्‍यांसाठी (नगरसोल-मिरज-नगरसोल),(पंढरपूर-अदिलाबाद-पंढरपुर), (अकोला-मिरज-अकोला)विशेष रेल्वे गाड्यांच्या ६ फे-या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे संभाजीनगर,जालना, परभणी,नांदेड,वाशिम,हिंगोली जिल्ह्यातील स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाचे भाविकांना वेध लागले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पायीदिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. एसटी महामंडळाने प्रत्येक आगारातून जादा बसगाड्यांची सोय केली आहे. दमरेच्या नांदेड विभागाने देखील पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त ५ जुलैपासून ३ विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुख्माईच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षी सुध्दा राज्याच्या अनेक भागातून पायीदिंड्या पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. रविवार ६जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने एसटी जादा बसगाड्यांची सुविधा केली आहे. दमरेच्या नांदेड रेल्वे प्रशासनाने देखील दरवर्षी प्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार ५ जुलै रोजी नगरसोल मिरज नगरसोल गाडी क्र. ०७५१५ ही रेल्वे सायंकाळी ७ वाजता नगरसोलहून सुटणार आहे. रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उस्मानाबाद, बार्शीटाऊन, कुईवाडी आणि पंढरपूर अशी धावणार आहे. परतीच्या प्रवासात याच मार्गे सोमवार ६ जुलै रोजी पंढरपूरहून सकाळी सायंकाळी ५, २५ वाजता सुटणारआहे. गाडी क्र. ०७५०५ ही अकोला मिरज – अकोला विशेष रेल्वेगाडी शनिवार ५ जुलै रोजी अकोला स्थानकातून सकाळी ११ वाजता सुटणार आहे. वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी,गंगाखेड,परळी वैजनाथ, पानगाव,लातूर रोड,उदगीर,भालकी, बिदर, झहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपूर वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुईवाडी आणि पंढरपूर अशी धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे रविवार ६ जुलै रोजी दुपारी २. १५ वाजता सुटणार आहे. त्यानंतर आदिलाबाद -पंढरपूर ही गाडी क्र. ०७०५०१ विशेष रेल्वे शनिवार ५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता आदिलाबाद येथून सुटणार आहे. पुढे किनवट, बोधडी, धानोरा, सहस्त्रकुंड, हिमायत नगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुडूवाडी रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. परतीच्या प्रवावात हीच रेल्वे रविवार ६ जुलै रोजी रात्री ११ वाजता कुडूवाडी रेल्वे स्थानकातून सुटणार आहे.भाविकांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाने केले आहे.

.

You cannot copy content of this page