शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली.

Spread the love

पूर्णा तालुक्यातील सुरवाडी शिवारात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा;मोजणी न करताच पथक परतले

पूर्णा, ता. १ (प्रतिनिधी) :प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या कडाडून विरोध होताना दिसत आहे.मंगळवाळी पूर्णा तालुक्यातील मौजे सुरवाडी शिवारात शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरल्यामुळे भुसंपादन करण्यासाठी आलेले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकास रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. नागपूरहुन कोल्हापूर मार्गे गोव्याला जोडला जाणा-या ८५० किमीच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.आता या मार्गाची भुसंपादन प्रकीया सुरू झाली आहे.मात्र अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यां कडून यास मोठा विरोध होताना दिसत आहे. महामार्गासाठी जमीन जात असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. भुसंपादन मोजणी करण्याचे आदेश निघाल्या नंतर या मार्गातील राज्यातील १२ जिल्ह्यातील शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत.पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी महसूल विभाग, कृषी विभाग, वनविभाग आदी विभागाचे अधिकारी भूसंपादन अभिलेख घेऊन मंगळवारी (ता. १) दाखल झाले होते. परंतु राज्य सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करत शेकडो शेतकऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांसह रस्त्यावर बैलगाड्यां सोबत घेऊन ठाण मांडून त्यांना रोखले.प्रसंगी पोलिसांनी मौठा फौज फाटा घेऊन बंदोबस्त ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्यांचे काहीही चालले नाही. शेवटी मोजणी न करताच अधिकारी , कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.यावेळी कृती समिती मधील कॉ. ॲड. माधुरी क्षीरसागर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सोनाली देशमुख, बापूराव घाटोळ, गोविंद घाटोळ, छगनराव मोरे, हनुमान भुसारे, बळीराम भुसारे, लिंबाजी खंदारे, गोपाळ मोरे, दिगंबर खंदारे, गणपतराव घाटोळ, माधव पडोळे, नामदेव भुसारे, विश्वनाथ भुसारे, उत्तम भुसारे, एकनाथ भुसारे, माधव वाघमारे, नागोराव भुसारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.त्यासोबतच प्रशासनाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर,पोलीस निरीक्षक विलास गोबाडे,तलाठी, मंडळ अधिकारी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page