अकोला-तिरुपतीला मुदतवाढ पुर्णा-पटनाला अतीरीक्त डब्बे.!

Spread the love

अकोला-तिरुपतीला मुदतवाढ पुर्णा-पटनाला अतीरीक्त डब्बे;नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती

पूर्णा ता.१(प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या तिरुपती-अकोला-तिरुपती विशेष एक्सप्रेस गाडीला मुदत वाढ देण्यात आली असून,त्यासोबतच पूर्णा-पटणा-पूर्णा गाडींस ३ डब्बे वाढवण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे. ०७६०५/०६ (तिरुपती-अकोला-तिरुपती) हि विशेष एक्सप्रेस गाडी ता.२७ जुन पर्यन्त चालवली जाणार होती.परंतु ही गाडी आता ४ जुलै पासून पुढील वर्षी २९ मार्च, पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वेने १७६१०/०९(पूर्णा-पटना-पूर्णा) एक्स्प्रेस गाडीला दोन द्वितीय व तृतीय वातानुकूलित तसेच एक शयनयान अशा ३ डब्यांची वाढ केली आहे.हे डब्बे ३ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान तातपुरत्या स्वरुपात जोडले जाणार आहेत. या गाडीत डब्यांची एकूण संख्या १९ झाली आहे.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.अकोला-तिरुपती,पूर्णा-पटणा या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page