विठ्ठल नामाच्या गजरात पूर्णानगरी दुमदुमली
पूर्णेत आषाढी महोत्सवानिमित्त भव्य पालखी व रिंगण सोहळा,हजारों भाविकांचा सहभाग, स्वा.सै.दाजिसाहेब पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम.
पूर्णा ता.६ जुलै(प्रतिनिधी) भगव्या पताका,टाळ,मृदंगाचा गजर माऊली माऊलीचा जयघोष बालगोपाळांची पावली,कवायती लयदार प्रात्यक्षिके भजन दिंड्या व हजारो अबालवृद्ध, महीला पुरुष भाविकांच्या सहभागाने आज रविवार दि.६ जुलै रोजी पूर्णा शहरात स्वा.कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान वतीने आयोजित करण्यात आलेला आषाढी महोत्सव पार पडला.यावेळी काढण्यात आलेल्या पालखी व गोल रिंगण सोहळ्याने पूर्णेकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पूर्णा शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वा.सै. दाजीसाहेब निळोबा कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या पुढाकाराने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.बाजार समीती यार्डात रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विजयकुमार कदम,विशाल कदम,विक्रम ऊर्फ विक्की कदम यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्ती व पादुका पुजन केले. आकर्षक सजवलेल्या पालखीतून दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली. .ही मिरवणूक वाजत गाजत मोठ्या हर्षोल्लासात टाळ, मृदंगाच्या निनादात विठ्ठललाची भक्तीगीते गात माऊलीच्या जयघोषात विवीध स्वरुपांच्या पावल्यांचे प्रकारही सादर केले.महीला भजनी मंडळ ही या दिंडीत हिरहिरीने सहभागी झाले होते.अत्यंत शिस्त बद्ध पद्धतीने ही दिंडी नवा मोंढा , आनंदनगर चौक,म.बसवेश्वर चौक महादेव मंदिर श्री गुरुबुद्धी स्वामी मठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मार्गक्रमण करत जुना मोंढा मैदानावर दाखल झाली. दरम्यान मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले.तर ठिक ठिकाणी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपवासाचे साहित्य तसेच पाण्याची सोय केली होती. जुना मोंढा बाजार मैदानावर भव्य दिव्य पालखीचा भव्य रिंगण सोहळा रंगला अनेक महिला पुरुषांनी वारकरी संप्रदायातील फुगड्या खेळत दिंडी सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.प्रसंगी उत्तमरावजी कदम, डॉ दत्तात्रय वाघमारे,डॉ.विनय वाघमारे,हिराजी भोसले, डॉ.हरिभाऊ पाटील, संतोष एकलारे श्यामराव कदम ,मुंजा भाऊ कदम, गणेश कदम, विशाल चितलांगे, अमृतराज कदम,प्रशांत कापसे, गोविंद ठाकूर,विशाल किरडे,रवि जैस्वाल, जगदीश जोगदंड, दौलत भोसले, आनंद आजमेरा, राजु अण्णा एकलारे, डॉ अजय ठाकूर, नागेश नागठाणे, शंकर गलांडे,जिगर लोढाया,माऊली कदम, दत्ता कदम,रवि कदम आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.विद्याप्रसारणी सभा शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक कवायती काठ्या, तलवार बाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. महाआरतीने या दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.सहभागी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी गणेश कदम यांच्या वतीने उपस्थित महीला वारकऱ्यांना विठ्ठल रखुमाईच्या मुर्ती भेट देण्यात आल्या.पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पालखी मार्गावर तसेच रिंगण सोहळ्या दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.प्रतिष्ठानच्या पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले











