पूर्णा बुद्ध विहारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट

Spread the love

पूर्णा ता.१२( प्रतिनिधी)

येथील बुद्ध विहारास परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सदिच्छा भेट देऊन भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा सन्मान केला. परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी हे शुक्रवारी पूर्णा तालुका दौऱ्यावर होते.त्यांनी यावेळी शहरातील बुद्ध विहारास सदिच्छा भेट दिली.जिल्हा मध्ये कायदा सुव्यवस्था सामाजिक सद्भभाव प्रस्थापित करण्या मध्ये स्वतःच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे जनमानसामध्ये सुपरिचित आहेत. त्यांनी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.ऊपगुप्त महाथेरो अध्यक्ष असलेल्या बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर व बुद्ध विहार समिती पूर्णा यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय रविंद्र सिंह परदेशी यांनी दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन डॉ उपगुप्त महाथेरो यांचा सत्कार केला.यावेळी भदंत पयावंश भदंत पय्यसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील ज्येष्ठ समाजसेवक देवराव खंदारे ,रिपाई कवाडे गटाचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंडे, अँड.हर्षवर्धन गायकवाड साहेबराव सोनवणे, दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती.

You cannot copy content of this page