बलीदान दिनी शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

Spread the love

पूर्णा ता.१२( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील वीर शिवा काशीद,बाजीप्रभू देशपांडे देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी रक्त सांडले.त्यांच्या३६५ बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावनसृतीस उजाळा देत अभिवादन करण्यात आले. पूर्णा शहरात जिवा सेना संघटना व जिवाजी महाले मित्र मंडळ यांच्या वतीने सातत्याने बलीदान दिवस साजरा केला जातो.येथिल राजे संभाजी चौकात ता.११ रोजी वीर शिवा काशीद,बाजीप्रभू देशपांडे देशपांडे यांचा बलिदान दिन साजरा करण्यात आला.प्रसंगी साहेबराव कल्याणकर, माऊली कदम, माधव आवरगंड, सोनाजी शिंदे, अँड.साखरे साहेब, सुनील माइंदळे, गजानन कराळे, राम भालेराव, राम सूर्यवंशी, रमण ठाकूर, उत्तमराव सूर्यवंशी राम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page